कर्म करिता फलाशा वाढ
2843.
कर्म करिता फलाशा वाढे । ते ते फल भोगणें घडे ॥१॥
कर्म करिता फळ बाधक । न करिता प्राप्त नरक ॥२॥
ऐशीं कर्माची रहाटी । सदैव देखे उफराटी ॥३॥
एका जनार्दनी कर्म । तेथे कैंचा भवभ्रम ॥४॥