वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

वैरागरापाशी रत्नाचिय

🙏 3. संत तुकाराम · ABH-077118 · अभंग क्र. २८४८

2848.
वैरागरापाशी रत्नाचिया खाणी । हेचि घ्यावी धणी फावेल तो ॥१॥
येथे नाही तर्कवितर्काची चाड । होतसे निवाड खऱ्याखोट्या ॥धृपद॥
उगाच सारवा वाढिला तो ठाव । वाढितिया भाव कळतसे ॥२॥
तुका म्हणे नव्हे टांचणीचे पाणी । येथे झरवणी जैशा तैसे ॥३॥

अर्थ :
वैरागर नावाचा मणी असतो तो काय करतो तर वाळूच्या खड्यांना स्पर्श करताच त्यांनाही रत्न करुन टाकतो त्यामुळे ज्याच्याजवळ वैरागर नावाचा मणी आहे त्यांनी आपल्याला हवे तेवढे रत्न करुन घेऊन आपली आवड आपली इच्छा पूर्ण करुन घ्यावी. अहो येथे तर्क किंवा वितर्क करण्याची काहीच गरज नाही खऱ्या खोटयाचा निवाडा येथे होत असतो. भोजन पंक्तीत जर वाढणारा व्यक्ती चतुर असेल तर आपण केवळ पात्रासमोर बसावे व जे जे समोर येईल ते ते खावे कारण वाढणारा व्यक्ती चतुर असतो तो आपल्या मनातील सर्वभाव जाणून घेत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, कोणत्याही काळी एखादया झऱ्यातून कितीही पाणी नेले तरी तो झरा वाहतच असतो व तेथे पाणी जसेच्या तसेच राहाते ते कधीही संपत नसते त्याप्रमाणे आपण भगवंताच्या या ठिकाणी एक शांततेने त्याचे चिंतन चित्तात करावे व त्याचे चिंतन दुसऱ्यालाही दयावे ते कितीही वाटले तरी संपत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग