वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

मागत्याची कोठे घडते

🙏 3. संत तुकाराम · ABH-077232 · अभंग क्र. २८५७

2857.
मागत्याची कोठे घडते निरास । लेंकरा उदास नाही होत ॥१॥
कासया मी होऊ उतावीळ जीवी । जाणता गोसावी सर्व आहे ॥धृपद॥
झाला तरी वेळ कवतुकासाठी । निर्दया तो पोटी उपजेना ॥२॥
तुका म्हणे त्यासी ठाउके उचित । होईंल संकेत नेमियेला ॥३॥

अर्थ :
देवाजवळ कोणी काहीही मागण्यास गेले तर त्याची निराशा कोठे होते काय आई आपल्या लेकराविषयी कधी उदास होत नाही. त्यामुळे मी उतावीळ तरी कशासाठी होऊ माझा जीव मी उतावीळ का करु कारण माझा सर्व जाणता माझा गोसावी आहे. माझ्या स्वामीच्या भक्तांच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ जरी लागला तरी ते केवळ त्याची गंमत त्याचे कौतुक पाहण्यासाठीच होईल परंतू माझ्या स्वामीच्या पोटात कधीही निदर्यता उत्पन्न होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या स्वामीला उचित काय आहे ते सर्व ठाऊक आहे त्यामुळे योग्य संकेत मिळाला की भक्तांचे कल्याण तो नक्कीच करतो हा त्याचा नियमच आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग