वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

विचारीं पा धडफुडें ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084857 · अभंग क्र. २८३६

2836.
विचारीं पा धडफुडें । देह तंव केवळ जडमूढे । कर्मसंबधन तयाकडे । केवी लागे ॥१॥
आत्मनीं न रिघे कर्म । कर्म केवळ श्रम । थिल्लरी जेवी सोम । चळी कांपे ॥२॥
देह जगत्व न लगे देही । अथवा न लगे आत्म्याच्या ठायी । आता कर्म ते मिथ्या पाही ॥३॥
भ्रमरुप वाढविता कर्मठपण । ठकलें सज्ञान जन । एका जनार्दनी कर्म भ्रमण । बोळवण रया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग