तुमच्या पाळणा ओढतसे
2852.
तुमच्या पाळणा ओढतसे मन । गेलो विसरोन आपणासी ॥१॥
लागेल पालट फेडावे उसणे । येणेचि प्रमाणे पांडुरंगा ॥धृपद॥
तुमचे आवडी संबंधाचा त्याग । घेतला से लाग जगनिंदेचा ॥२॥
तुका म्हणे जैसा माझा जीव ओढे । तैसेंच तिकडे पाहिजेल ॥३॥
अर्थ :
देवा तुमचे रक्षण करण्याकरता माझे मन ओढ घेत आहे परंतू त्या छंदामध्ये मीच मला स्वत:ला विसरुन गेलो आहे. हे पाडूरंगा मी तुमचे जसे रक्षण करतोना तसेच तुम्ही माझेही रक्षण करावे मग आपले उसने फेडले जाईल कारण उसने फेडणे ही जगाची रीतच आहे. देवा मी तुमची आवड धरली त्यामुळे मी सर्व माझ्यासंबधी जणांचा त्याग केला आणि जग माझी आता निंदा करत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा जसा माझा जीव तुमच्याकडे ओढ घेत आहे त्याप्रमाणे तुम्ही देखील माझ्याकडे ओढ घेतली पाहिजे.
