कोणा ब्रह्मकर्म कळेन
2817.
कोणा ब्रह्मकर्म कळेना हे वर्म । नासिलें जीवन संध्या वेळें ॥१॥
धरिले नासिक अनुभवावांचुनीं । त्रिपुटीस पाणी लावियेले ॥२॥
डोळिया वंदना स्वीकारिले कान । तेथे वर्म कोण नेणवेची ॥३॥
हृदयावरी हात नाभीस लाउनी । डोळे ते झाकुनी नाश केला ॥४॥
करी प्रदक्षिणा गुरु गुह्माविण । व्यर्थ केला शीण वाया तो ॥५॥
वेळ चुकवुनी संध्या करी भलते वेळे । केले अमंगळ ब्रह्माकर्म ॥६॥
फिरवितो मणी बुटबुटा ते होट । अजप तो कोठे स्थान नेणे ॥७॥
नेणे तो आचाट करी वेडेचार । काय तो गव्हार संध्या जाणे ॥८॥
एका जनार्दनी चुकविला नेम । काय पशु अधम जन्मा आले ॥९॥
