आता धर्माधर्म विचार
2825.
आता धर्माधर्म विचार । तो ऐका सविस्तर ॥१॥
शुद्र पतीत गृहींचें अन्न । एक रात्र पावन जाण ॥२॥
व्याघ्र - नख गज - दंत । अपवित्र जंव स्नेहयुक्त ॥३॥
पटतंतु स्वये पुनीत । वायूनें शुद्ध उर्णावस्त्र ॥४॥
गोक्षीर पवित्र कास्यपात्रीं । तेंचि अपवित्र ताम्रपात्री ॥५॥
घृत पवित्र अग्नि संस्कारी । अग्नि पवित्र ब्राह्मणमंत्री ॥६॥
वेद पवित्र गुरुमुखें । गुरुपवित्र निजात्मसुखें ॥७॥
पृथ्वी पवित्र जळ संस्कारी । जळ पवित्र पृथ्वीवरी ॥८॥
व्याघ्राजिन मृगाजिन । हे स्वाभाविक पवित्र जाण ॥९॥
एका जनार्दनी निर्धार । मुख्य पवित्रता अंतर ॥१०॥
