वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

काही एक तरी असावा आध

🙏 3. संत तुकाराम · ABH-076982 · अभंग क्र. २८२२

2822.
काही एक तरी असावा आधार । कासयाने धीर उपजावा ॥१॥
म्हणविल्यासाठी कैसे पडे रुजु । धणी नाही उजू सन्मुख तो ॥धृपद॥
वेचल्या दिसांचा कोणावरी लेखा । घालावा हा सुखासुखा आम्ही ॥२॥
नाही मनोगत तोवरी देवा । तुका म्हणे सेवा नेघेजेतो ॥३॥

अर्थ :
देवा मनुष्याला कोणता तरी काही तरी एक आधार असावा नाही तर कशाच्या जीवावर धीर धरावा ? जर धनीच समोर नसेल तर आपण बोललेले इतरांना मान्य कसे होईल ? व्यर्थ गेलेल्या दिवसांचा लेखा आम्ही कोणाच्या माथ्यावर देवा घालावा ? तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा जोपर्यंत तुमच्या मनात येणार नाही तोपर्यंत तुम्ही आमची सेवा घेणार नाही हे मला समजले आहे आणि हे मात्र निश्चिंत आहेच.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग