केवढा तो अहंकार । मा
2843.
केवढा तो अहंकार । माझा तुम्हा नव्हे दूर ॥१॥
आता कोण पडे पाया । तुमच्या अहो पंढरिराया ॥धृपद॥
का जी कृपेने कृपण । वेचतसे ऐसे धन ॥२॥
तुका म्हणे देवे । दुजियाचे पोते न्यावे ॥३॥
अर्थ :
देवा माझा अहंकार तरी केवढा आहे, मी तुम्हाला शरण आलो तरी देखील तुम्हाला तो दूर करता येत नाही. अहो पंढरीराया जर तुम्हाला माझा अहंकारच घालवता येत नाही तर मग तुमच्या पाया कोण पडणार आहे ? देवा तुम्ही कृपा करण्याविषयी असे कृपण म्हणजे कंजूष का आहात कृपा करण्याविषयी तुम्ही असा कंजूषपणा करत आहात जसे काही तुमचे काही धनच खर्च होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवा तुमच्यात व माझ्यात जो व्दैतपणा आहे त्याचे पोते तुम्ही घेऊन जावे.
