वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

उरले ते भक्तिसुख । ड

🙏 3. संत तुकाराम · ABH-077288 · अभंग क्र. २८२४

2824.
उरले ते भक्तिसुख । डोळा मुख पाहावे ।
अंतरीचे का हो नेणा । नारायणा माझिया ॥१॥
पुरवा तैसी केली आळी । बळी जगदानिया ॥धृपद॥
हाती घेउनि चोरा भाते । दावा रिते बाळका ।
साजते हे थोरपण । नाही दिणवत्सला ॥२॥
शाहणे तरी लाड दावी । बाळ जेवी मातेसी ।
तुका म्हणे पांडुरंगा । ऐसे पै गा आहे हे ॥३॥

अर्थ :
देवा आता डोळयाने तुझे मुख पाहावे एवढेच एक भक्तीसुख उरले आहे. हे नारायणा तुम्ही माझ्या अंत:करणातील काहीच जाणत नाही असे का बरे ? देवा तुम्ही जगाला दान देणारे बलवान दाता आहात त्यामुळे मी जसा हट्ट तुमच्यापाशी केला आहे तो हट्ट आता पूर्ण करा. देवा तुम्ही खाऊ चोरुन घेऊन लपून ठेवता व माझ्यासारख्या अज्ञानी बालकाला हात रिकामेच असल्याचे भासवता. हे दीनवत्सला तुमच्या थोरपणाला असे वागणे साजेसे दिसत नाही. मोठे मुल शहाणे असतात तरीपण कधी कधी लाडात येतात आणि आईच्या हातानेच जेवण करतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा असाच काही प्रकार आपल्या दोघाचा म्हणजेच देव आणि भक्ताचा आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग