वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

एकविध वृत्ति न राहे

🙏 3. संत तुकाराम · ABH-077047 · अभंग क्र. २८३०

2830.
एकविध वृत्ति न राहे अंतरी । स्मरणींच हरी विस्मृति हे ॥१॥
कैसा हा नवलाव वाटतो अनुभवे । मज माझ्या जीवे साक्षित्वेसी ॥धृपद॥
न राहे निश्चळि जागविता मना । किती क्षणाक्षणा सावरावे ॥२॥
तुका म्हणे बहु केले वेवसाव । तेणे रंगे जीव रंगलासे ॥३॥

अर्थ :
हे हरी माझ्या अंतरामध्ये तुमच्याविषयी एक विध वृत्ती राहातच नाही तुमचे स्मरण करु गेले पाहाता थोडयाच वेळात विस्मृती होते. या माझ्या अनुभवाचे मला तर नवलच वाटते आणि ह्या अनुभवाविषयी माझा जीवच साक्षी आहे. माझ्या मनाला कितीही जागवण्याचा प्रयत्न केला सावध करण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते निश्चल राहातच नाही किती क्षणाक्षणाला त्याला किती सावरत बसावे ? तुकाराम महाराज म्हणतात, मी आतापर्यंत प्रपंचाचा व्यवसाय खूप केला आहे आणि त्याच रंगात माझा जीव रंगला त्यामुळेच बहुतेक असे होत असेल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग