शम दम तप शौच आणि क्ष
2812.
शम दम तप शौच आणि क्षमा । आर्जव तो प्रेमा ज्ञानालागीं ॥१॥
आत्मा अनुभव वेदीं सत्य भाव । ब्राह्मण स्वभाव कर्म ऐसे ॥२॥
ब्राह्मणाच्या ठायी गुण शुद्ध सत्त्व । वसे ब्रह्मातत्त्व तया चित्ती ॥३॥
सर्वांभुती दया असे तयापाशीं । विटला उपाधीसी सर्वभावे ॥४॥
एकाजनार्दनी ऐसे हे ब्राह्मण । तयांचे चरण नित्य वंदूं ॥५॥
