घालूनी लोळणी पडलो अं
2826.
घालूनी लोळणी पडलो अंगणी । सिंचा सिंचवणी तीर्थ वरी ॥१॥
वोल्हावेल तनु होईंल शीतळ । झाली हळहळ बहुतापे ॥धृपद॥
पावेन या ठाया कई झाले होते । आलो अवचिते उष्ट्यावरी ॥२॥
तुका म्हणे कोणी जाणवा राउळी । येईल जवळी पांडुरंग ॥३॥
अर्थ :
देवा मी तुमच्या अंगणी पडून तुम्हाला लोटांगण घातले आहे आता तुमच्या अंगावरचे तीर्थ तेवढे माझ्या अंगावर शिंपडा. म्हणजे माझी शरीरयष्टी पुष्ट होईल आणि त्रिविधतापाने जो माझ्या शरीरामध्ये अग्नी उत्पन्न झाला आहे त्यामुळे माझी खूप हळहळ होत आहे ते देखील शांत होईल. मी संतांजवळ केव्हा आलो असतो, परंतू आता अवचितच मी त्यांचे उष्टे खाण्यासाठी आलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो कुणीतरी पाडूरंगाच्या देवळात जा आणि हा सर्व घडलेला प्रकार पाडूरंगाला सांगा म्हणजे तो माझ्याजवळ येईल.
