वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

तुम्हा उद्धरणे फार ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-076999 · अभंग क्र. २८२८

2828.
तुम्हा उद्धरणे फार । मज दुसरी नाही थार ॥१॥
आता जैसे तैसे सोसा । काय करणे हृषीकेशा ॥धृपद॥
बरे न दिसेल ओळी । एका अन्न एका गाळी ॥२॥
लाविता आभार । तुका विसरलेती फार ॥३॥

अर्थ :
देवा तुम्हाला खूप भक्तांचा उद्धार करणे आहे परंतु मला तुमच्या वाचून दुसरीकडे कोठेही थारा नाही. त्यामुळे हे ऋषिकेषा आता आमचे जसे अपराध असतील तसे तुम्ही सहन करा न सहन करून तरी तुम्ही काय करणार आहात? देवा एकाच पंक्तीत बसलेल्यांना जेवण वाढत असताना एकाला अन्न वाढायचे आणि एकाला नाही हे चांगले दिसणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही मला पार विसरले आहात परंतु सर्वत्र असे दाखवता की माझ्यावर फारच तुम्ही उपकार केलेले आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग