वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

एक परि बहिरे बरे । प

🙏 3. संत तुकाराम · ABH-077432 · अभंग क्र. २८३५

2835.
एक परि बहिरे बरे । परि ती ढोरे ग्यानगंडे ॥१॥
कपाळासी लागली अगी । अभागी का जीतसे ॥धृपद॥
एक परि बरे वेडे । तर्कि कुडे जळो ते ॥२॥
तुका म्हणे खातडवासी । अमृतासी नोळखे ॥३॥

अर्थ :
एक वेळेस बहिरे बरे परंतु ज्यांना ज्ञानाचा अभिमान आहे ते जनावरा सारखेच आहेत. त्यांच्या कपाळाला अभिमानाची आग लागलेली असते असे अभागी मनुष्य का जगत असतात? एक वेळेस वेडी माणसे बरे आहेत परंतु तर्ककुतर्क करणारी माणसे फार वाईट असतात त्यांना आग लागो. तुकाराम महाराज म्हणतात नेहमी घाण खाणाऱ्यांना अमृताची गोडी काय कळणार आहे त्याप्रमाणे ज्ञानाचा अभिमान असणाऱ्या आणि तर्ककुतर्क करणाऱ्या व्यक्तींना भक्तीची गोडी कळणार नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग