देवातळींचें वस्त्र त
2834.
देवातळींचें वस्त्र ते म्हणती अपवित्र । उदके भिजविलें ते जाले पवित्र ॥१॥
देवापरीस जळ सबळ केले । ज्ञान ते दुर्बळ होऊनीं ठेले ॥२॥
नीचाचेनी स्पर्शे देवो विटाळला । पाणीये प्रक्षाळुनी सोंवळा केला ॥३॥
एका जनार्दनी साच नाही भाव । संशयची देव नाही केला ॥४॥
