कोटी जन्म आम्ही करू
2849.
कोटी जन्म आम्ही करू हरिकथा । कर्मकांड माथा धरूनियां ॥१॥
ऐहिकादि कर्मे करुनी सर्वदा । भजो जी गोविंदा निरंतर ॥२॥
यजन याजन करुनी अग्निहोत्र । पूजोनि पवित्र द्विजवर ॥३॥
एका जनार्दनी कर्म ब्रह्मा एक । वेदान्ती विवेक बोलियेला ॥४॥
