ब्राह्मणवाक्यबळें वे
2811.
ब्राह्मणवाक्यबळें वेदू नेमी जगा । येरव्ही राहे उगा थोटावला ॥१॥
ब्राह्मण तो ब्रह्मा ब्राह्मण तो ब्रह्मा । जयाचेनि कर्माकर्म दाटुगें जगी ॥२॥
ब्रह्मावाक्याची राणीव तै शास्त्राची जाणीव । येरव्ही नुसते पवे पाषाणाचें ॥३॥
ब्राह्मण वचनार्थ यागकर्म समर्थ । येरव्ही ते समस्त जीत ना मेली ॥४॥
जिवाचें जीवपण शिवाचें शिवपण । याहुनी ब्रह्मापुर्ण ब्राह्मणक वाक्य ॥५॥
पाठ नाही पोट नाही ब्रह्मा ते निघाट । हाही अनुभव स्पष्ट ब्राह्मणवचने ॥६॥
ब्रह्मा ते निर्मळ संसार तो मृगजळ । हेंही होय विव्हळ ब्राह्मणवचने ॥७॥
एका जनार्दनी ब्राह्मण पूर्ण बोधु । जाणे तया बाधूं न शके कर्माकर्म ॥८॥
