वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

आता येथे खरे । नये फ

🙏 3. संत तुकाराम · ABH-077203 · अभंग क्र. २८१७

2817.
आता येथे खरे । नये फिरता माघारे ॥१॥
होय तैसी हो आबाळी । देहनिमित्य या बळी ॥धृपद॥
तुम्हासवे गाठी । देवा जीवाचिये साठी ॥२॥
तुका नव्हे लंड । करू चौघांमध्ये खंड ॥३॥

अर्थ :
देवा आम्ही आता संसाराची तूट म्हणजे नुकसान करुन घेतली आहे केवळ आमच्या उध्दारासाठी आता आम्हाला मागे फिरता येणार नाही. आता जशी आबाळी व्हायची तशी होऊ दया या आबाळीला केवळ निमित्ताने देहबळी दिला तरी हरकत नाही. देवा आम्ही आमचा जीवच समर्पण केला आहे केवळ तुमची गाठ पडावी म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आपल्या दोघामध्ये कोण लबाड आहे कोण खोटारडा आहे याचा चारचौघांमध्येच निवाडा करु.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग