आम्हा विधिनिषेधाचे न
2852.
आम्हा विधिनिषेधाचे नाही पै कारण । नाम मुखी स्मरण गोविंदाचे ॥१॥
घडेल ते घडो जोडेल ते जोडो । आम्ही तो न सोडोंक रामकृष्ण ॥२॥
शरीर पतन घडे अनायासें । काय ते सायासें जतनेंचि ॥३॥
एका जनार्दनी श्रीरामावांचुनीं । दुजा छंद मनी हा न वाहे ॥४॥
२८५३
विधिनिषेध कवणेपरी । कार्या कारण ते परी ॥१॥
नाम जपतां सादर । विधिनिषेध पळे दूर ॥२॥
व्रत करा एकादशी । कंठी मिरवा तुळशी ॥३॥
करा घोष हरिकथा । विधिनिषेध वंदीत माथा ॥४॥
एकपणे जनार्दने । एका विधिनिषेध नेणे ॥५॥
