वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

असोनि ब्राह्मण । न क

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084861 · अभंग क्र. २८१८

2818.
असोनि ब्राह्मण । न करी जो संध्या स्नान ॥१॥
तो पातकी चांडाळ । अधम खळाहुनी खळ ॥२॥
वेदमंत्र न ये मुखा । सदा द्वेष निंदा देखा ॥३॥
नाहे श्राद्धसंकल्प घरी । हिंडें सदा दारोदारीं ॥४॥
हरिनामी न बैसे चित्त । लोका पुराण सांगत ॥५॥
ऐसे पामर अभागी । तयांचे दोष कोण भंगी ॥६॥
एका जनार्दनी नाम । वाचे होऊनी वदा निष्काम ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग