नाही मज कोणी उरला दु
2853.
नाही मज कोणी उरला दुर्जन । मायबापाविण ब्रम्हांडांत ॥१॥
कासया जिकीर करणे येविसी । भयाची मानसी चिंता खंती ॥धृपद॥
विश्वंभराचिये लागलो सांभाळी । सत्तेने तो चाळी आपुलिये ॥२॥
तुका म्हणे माझे पाळणपोषण । करिता आपण पांडुरंगा ॥३॥
अर्थ :
संपूर्ण ब्रम्हांडामध्ये माझा मायबाप पाडूरंगच सामावलेला आहे त्यामुळे माझ्यासाठी ब्रम्हांडात कोणीही दुर्जन उरलेला नाही. त्यामुळे मला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची काय गरज आहे कारण मनामध्ये भय चिंता आणि खंतच राहिली नाही. विश्वाचा चालक असा विश्वंभर तोच माझा सांभाळ करीत आहे व त्याच्याच सत्तेखाली मी चालत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे पाडूरंगा तुम्हीच माझे पालनपोषण करीत आहात.
