ब्रह्मा जाणे ब्राह्म
2816.
ब्रह्मा जाणे ब्राह्मण याती । त्याची घडावी संगती ॥१॥
ब्राह्मण तयासी म्हणावे । त्याचे पायी लीन व्हावे ॥२॥
गळा घालोनि सूत्रदोरी । म्हणविती ब्रह्माचारी ॥३॥
परी ब्रह्मा नाही ठावे । लोका सांगतसे भावे ॥४॥
एका जनार्दनी पूर्ण । ब्रह्मा जाणे तो ब्राह्मण ॥५॥
