वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

तरी भले वाया गेलो ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-077300 · अभंग क्र. २८२५

2825.
तरी भले वाया गेलो । जन्मा आलो मागुता । म्हणऊनि ठेलो दास । सावकास निर्भये ॥१॥
उणे पुरे काय माझे । त्याचे ओझे तुम्हासी ॥धृपद॥
सांभाळावे ते म्या काई । अवो आई विठ्ठले । भोग जया जाईन स्थळा । तुज गोपाळा विसरेंना ॥२॥
आपले म्या एकसरे । करुनि बरे घेतले । तुका म्हणे नारायणा । आता जाणा आपुले ॥३॥

अर्थ :
देवा माझा मागचा जन्म तर वायाच गेला परंतू माझे काही तरी चांगले कर्म होते म्हणूनच मी पुन्हा मनुष्य जन्माला आलो हेच फार चांगले झाले. त्यामुळेच मी सावकाश आणि कोणत्याही प्रकारचे भय न धरता निर्भयपणाने तुझा दास होऊन राहिलो आहे. त्यामुळेच देवा आता माझ्या मते जे काही उणेपुरे आहे त्याचे सर्व भार तुमच्याच खांदयावर आहे. हे आई विठ्ठले मी काय काय सांभाळावे ? हे गोपाळा मी प्रारब्धाच्या आधीन आहे त्यामुळे ते भोगताना मी ज्या जन्माला जाईन तेथे गेलो तरी तुला विसरणार नाही. देवा मी माझे एकदमच चांगले करुन घेतले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा आता आपले काही कर्तव्य राहिले आहे हे तुम्ही जाणून घ्यावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग