वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

प्रीतीच्या भांडणा ना

🙏 3. संत तुकाराम · ABH-077318 · अभंग क्र. २८५९

2859.
प्रीतीच्या भांडणा नाही शिरपाव । वचनाचेचि भाव निष्ठुरता ॥१॥
जीणे तरी एका जीवे उभयता । पुत्राचिया पिता दुखवे दुःखे ॥धृपद॥
काय जाणे तुटो मायेचे लिगाड । विषम ते आड उरो नेणे ॥२॥
तुका म्हणे मज करुणा उत्तरे । करिता विश्वंभरे पाविजेल ॥३॥

अर्थ :
प्रेमात जे भांडण होते त्याला शेंडा आणि बुडूख काहीच नसते केवळ बोलण्यातच निष्ठूरता असतो. पिता आणि पुत्र दोघेही एकाच जीवाने जीवन जगतात पुत्राच्या थोडयाशा दु:खाने देखील पित्याला दु:ख होते. देवाची माझ्या विषयी मायेची उपाधी तुटली आहे की काय हे मला समजत नाही कारण देवात व माझ्यात जी विषमता आहे तो देवच आता ती विषमता उरुच देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी विश्वंभराशी दोन प्रेमाचे करुणेचे शब्द बोललो की तो लगेच मला दर्शन देईल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग