वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

एका एक वर्मे लावूनिय

🙏 3. संत तुकाराम · ABH-077042 · अभंग क्र. २८१६

2816.
एका एक वर्मे लावूनिया अंगी । ठेवितो प्रसंगी सांभाळीत ॥१॥
नेघावा जी तुम्ही वाव बहु फार । धरूनि अंतर ठायाठाव ॥धृपद॥
वेव्हारे आले ते समानचि हाते । बळ नाही येथे चालो येत ॥२॥
तुका म्हणे आता निवाडाच साठी । संवसारे तुटी करुनि ठेलो ॥३॥

अर्थ :
देवा तुमचे व आमचे एकेक वर्म मी जसेच्या तसेच तुमच्या अंगी ठेवीन आणि प्रसंगी त्याचा सांभाळ करुन संतांपुढे ते सांगेन. देवा तुम्ही जास्त फार अवकाश धरुन आमच्यापासून अंतर ठेवून राहू नका. देवा व्यवहार कोणताही असो जेथे जो नियम आहे तो सर्वांना समानच असतो. मग तो जीवन जगण्याचा व्यवहार असो किंवा व्यवहारामधील असो तेथे सर्वांना सारखाच नियम असतो तेथे कोणाचेही काही बळ चालत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता काय तो निवाडा करा माझा उध्दार करा या निवाडयासाठीच मी माझ्या सर्व संसाराची तूट म्हणजे नुकसान करुन ठेवली आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग