संध्यावंदनीं प्रणव ज
2846.
संध्यावंदनीं प्रणव जपावा । वाच्य वाचकु प्रणव अवघा ॥१॥
कैसी संध्येसी साधिली संधी । देही हारपली देहबुद्धी ॥२॥
छंद ऋषि मंत्र उच्चार । ती अक्षरीं झाले अक्षर ॥३॥
जपी जपमाळा मौनी । संध्या साधिली निज समाधानीं ॥४॥
सायं प्रातः माध्यान्हींक । तिही संधी निःसंदेह एक ॥५॥
काळेंक काळ तीन चुळा पाणी । संध्या साधिली एका जनार्दनी ॥६॥
