वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

माझ्या कपाळाच्या गुण

🙏 3. संत तुकाराम · ABH-077077 · अभंग क्र. २८२१

2821.
माझ्या कपाळाच्या गुणे । किंवा सरलेसे नेणे ॥१॥
नये वचन बाहेरी । उभे तिष्ठतसे दारी ॥धृपद॥
काय सांगायास वेचे । रीते आरंभी ठायीचे ॥२॥
तुका म्हणे किती । भीड धरावी पुढती ॥३॥

अर्थ :
देवा हे माझ्या भाग्याचे गुण आहेत की तुझ्याजवळचे सर्व काही संपले आहेत हे मला काही समजत नाही. देवा मी बाहेर तुझ्या दारामध्ये तिष्ठत उभा आहे तुझे कोणतेही बोलणे मला ऐकू येत नाही. माझ्याजवळचे सर्व काही संपले आहे हे तू सुरवातीलाच सांगितले असते तर तुझ्याजवळचे काही खर्च झाले असते काय ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता तुझी भीड तरी पुढे किती दिवस धरावी ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग