आपण चाळक बुद्धीच्या
2815.
आपण चाळक बुद्धीच्या संचारा । आम्हासी वेव्हारा पात्र केले ॥१॥
काय झाले तरी नेघा तुम्ही भार । आणीक कोणा थोर म्हणो सांगा ॥धृपद॥
पंच भूते तव चर्माचिया मोटा । येथे खरा खोटा कोण भाव ॥२॥
तुका म्हणे नाही बोलावया जागा । का देवा वाउगा श्रम करू ॥३॥
अर्थ :
देवा तुम्ही सर्वांच्या बुध्दीमध्ये संचार करता आणि सर्व जगाला चालवता तुम्ही सर्व जगाचे चालक आहात आम्ही केवळ व्यवहार करण्यासाठी निमित्त आहोत. देवा काय झाले म्हणून तुम्ही आमच्या योगक्षेमाचा भार तुमच्या खांदयावर घेत नाही आणि मी तुमच्यावाचून दुसऱ्या कुणाला श्रेष्ठ म्हणू ? पंचमहाभूतांना श्रेष्ठ म्हणावे तर पंचमहाभूते हे कातडयाच्या मोटेत बांधलेली आहेत. मग तेथे खरा किंवा खोटा असा निवाडा कसा काय करता येईल ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता मी तुम्हाला बोलण्यासाठी कोणती जागाच ठेवली नाही त्यामुळे विविध प्रकारचे प्रश्न विचारुन मी का बरे स्वत:ला कष्ट करुन घेऊ.
