वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

नव्हो सभाधीट । समोर

🙏 3. संत तुकाराम · ABH-077271 · अभंग क्र. २८१९

2819.
नव्हो सभाधीट । समोर बोलायाचे नीट । एकली एकट । दुजे नाही देखिले ॥१॥
आता अवघे तुम्ही जाणा । तुमचे माझे नारायणा । येईल करुणा । तेचि पहा तुम्हासी ॥धृपद॥
ताळ नाही माझे बुद्धी । धरली न धरवे शुद्धी । आता वेळ कधी । कोण्या जन्मे निवाड ॥२॥
आता शेवटीचे । उत्तर ते हेचि साचे । शरण आले त्याचे । तुका म्हणे सांभाळा ॥३॥

अर्थ :
देवा एकदमच तुमच्यासमोर नीट येऊन बोलणे एवढे आमचे धैर्य नाही एवढे आम्ही सभाधिट नाहीत. परंतू देवा तुम्ही आम्हाला एकटे एकातात दिसले दुसरे कोणीही तुमच्याजवळ दिसले नाही त्यामुळे मी तुमच्याशी बोलत आहे. हे नारायणा आता तुमचे व माझे काय कर्तव्य आहे हे तुम्हीच ठरवा. आणि तुम्हाला माझ्यावर दया येईल तेच तुम्ही पाहावे करावे. माझ्या बुध्दीला तर ताळाच राहिलेला नाही ती शुध्दीवर जरी धरण्यास गेले तरी ती धरली जात नाही. आता माझ्या सेवेला फळ केव्हा येईल आणि कोणत्या जन्मात तुम्ही माझा उध्दाराचा निवाडा करणार आहात? तुकाराम महाराज म्हणतात, आता तुम्हाला शेवटचे हेच सांगायचे आहे देवा, मी तुम्हाला शरण आलो आहे तुम्ही माझा सांभाळ करा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग