नाही खंड झाला । माझा
2833.
नाही खंड झाला । माझा तुमचा विठ्ठला ॥१॥
कैसे कैसे हो दुश्चित । आहे चौघांपाशी नीत ॥धृपद॥
मुळींचे लिहिले । मज आता सापडले ॥२॥
तुका म्हणे मज । न लगे बोलणे सहज ॥३॥
अर्थ :
हे विठ्ठला तुमची आणि माझी अजून खंडणी म्हणजे वाटणी झाली नाही त्यामुळे आपण एकच आहोत. अहो मग देवा तुम्ही आमच्याविषयी असे उदास का असता याविषयी संतांजवळ नीती आहे मग आपला हा निवाडा संतच करतील. देवा परमार्थामध्ये सर्व मूळ म्हणजे वेद आहे आणि वेदामध्ये जे काही लिहिले आहे ते आता मला सापडले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवा विठ्ठला त्या वेदामध्ये असे लिहिले आहे की तत्वमसि म्हणजे ते ब्रम्ह तूच आहेस मग आता या व्यतिरिक्त मला सहज देखील काही बोलण्याची गरजच नाही.
