वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

मज काही सीण न व्हावा

🙏 3. संत तुकाराम · ABH-077301 · अभंग क्र. २८५४

2854.
मज काही सीण न व्हावा यासाठी । कृपा तुम्हा पोटी उपजली ॥१॥
होते तैसे केले आपले उचित । शिकविले हित बहु बरे ॥धृपद॥
आम्ही न मनावी कोणाची आशंका । तुम्हा भय लोका आहे मनी ॥२॥
तुका म्हणे आता संचिताचा ठेवा । वोढवला घ्यावा जैसा तैसा ॥३॥

अर्थ :
देवा मला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी तुमच्या ह्दयामध्ये कृपा उत्पन्न झाली आहे. देवा तुमच्यासाठी जे उचित आहे जे योग्य आहे तसेच तुम्ही केले आहे आणि मला चांगल्या हिताच्या गोष्टी खूप शिकवल्या आहेत. देवा अहो आम्हाला कसलीही प्रकारची शंका भीती नाही परंतू भक्तांचा उध्दार तुम्ही जर केला नाही तर लोक तुम्हाला नावे ठेवतील याचे भय तर तुमच्या मनात नक्कीच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जसा संचिताचा प्रारब्धाचा ठेवा असेल तसा भोगावाच लागतो असा नियमच आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग