वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

समर्थ या नावे दिनांच

🙏 3. संत तुकाराम · ABH-077176 · अभंग क्र. २८४९

2849.
समर्थ या नावे दिनांचा कृपाळ । हे तव सकळ स्वामीअंगी ॥१॥
मज काय लागे करणे विनवणी । विदित चरणी सकळ आहे ॥धृपद॥
दयासिंधु तुम्हा भांडवल दया । सिंचावे आता या कृपामृते ॥२॥
तुका म्हणे अहो पंढरिनिवासे । बहु जीव आसे लागलासे ॥३॥

अर्थ :
जो दीनांचा कृपाळू आहे त्याचे नांव समर्थ आहे आणि हे सर्व गुण तर माझ्या स्वामीच्या अंगात आहेत. मी एक दीन आहे आणि माझा स्वामी कृपाळू समर्थ आहे त्यामुळे माझी कोणतीही विनंती त्यांना सांगण्याचे काय कारण आहे कारण माझी सर्व विनंती तर त्याच्या चरणाजवळ विदीतच आहे. दयासिंधू हे माझे स्वामी तुमच्याजवळ दया करणे हेच तर तुमचे भांडवल आहे त्यामुळे तुमच्या कृपेचे अमृत माझ्यावर आता सिंचन करावे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो पंढरीनिवासा तुम्ही माझ्यावर कधीतरी दया कराल या आशेनेच माझा जीव तुमच्याकडे खूप लागला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग