कर्म करसी तरी कर्मठच
2847.
कर्म करसी तरी कर्मठचि होसी । परि निष्कर्म नेणसी कर्मामाजीं ॥१॥
ब्रह्मालागीं कर्म सांडणे हे कुंडें । पाय सांडोनि पुढे चालुं पाहसी ॥२॥
डोळ्यांची नव्हाळी घेवो जाता करतळी । पाहो जाता मुळी पाहणेंचि नाही ॥३॥
एका जनार्दनी सर्व कर्म पाही । सांडी मांडी नाही तये ठायी ॥४॥
