वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

न कळे जी भक्ती काय क

🙏 3. संत तुकाराम · ABH-077320 · अभंग क्र. २८२९

2829.
न कळे जी भक्ती काय करू सेवा । संकोचोनि देवा राहिलोंसे ॥१॥
जोडोनिया कर राहिलो निवांत । पायापाशी चित्त ठेवूनिया ॥धृपद॥
दिशाभुली करी स्थळी प्रदक्षणा । भ्रमे नारायणा कष्टविले ॥२॥
तुका म्हणे झालो आज्ञेचा पाळक । जीवनासी एक ठाव केला ॥३॥

अर्थ :
देवा मला भक्ती कळत नाही आणि सेवा कशी करावी हे ही समजत नाही त्यामुळे संकोच निर्माण झाला व मी स्वस्थ राहिलो. देवा मी माझे दोन्ही कर जोडून आणि तुमच्या पायाजवळ माझे चित्त ठेवून निवांत राहिलो आहे. हे नारायणा दिशाभूल झाली की मनुष्य जसा एकाच स्थळाला सारख्या चकरा मारत असतो त्याप्रमाणे भ्रमानेच मनुष्याला कष्ट होतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुमचा आज्ञाधारक झालो आहे आणि जीवन जगण्यासाठी तुमचा एक आश्रय केला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग