कर्माच्या पोटी भ्रम
2838.
कर्माच्या पोटी भ्रम । की भ्रमाच्या पोटी कर्म । हे दोहींचे न कळे वर्म । जाणत्यासी ॥१॥
घटी उदक भरिलें । तेणे घटाकाश नव्हे बोले । कर्मीं ब्रह्मा संचलें । कर्मातीत ॥२॥
वाढविता कर्मभ्रम । न कळे परब्रह्मा । मीमांसक धर्म । अनश्वर ॥३॥
कर्माची कर्मगती । न सोडी पुनरावृत्ति । निशेष कर्म निश्चिती । ब्रह्माप्राप्ती ॥४॥
निष्कर्म लभ्यते सिद्धी । हे कृष्णें उपदेशिलें कृपानिधी । तरी कर्माची कर्मबुद्धी । न सोडी आत्मा ॥५॥
कर्माचें निजकर्म । केवळ परब्रह्मा । एका जनार्दनी मिथ्या । कर्मश्रम ॥६॥
