वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

पडिलिया ताळा । मग अव

🙏 3. संत तुकाराम · ABH-077013 · अभंग क्र. २८४०

2840.
पडिलिया ताळा । मग अवघा निर्वाळा । तेथे कोणी बळा । नाही येत कोणासी ॥१॥
जोडिले ते लागे हाती । आपआपली निश्चिंती । हर्ष आणि खंती । तेथे दोनी नासली ॥धृपद॥
सहज सरलिया कारणे । मग एकला आपण । दिसे तरी भिन्न । वचनाचा प्रसंग ॥२॥
करूनि झाडा पाडा । तुका वेगळा लिगाडा । निश्चिंतीच्या गोडा । गोष्टी म्हणु लागती ॥३॥

अर्थ :
एकदा की सर्वत्र ब्रम्ह आहे असे लक्षात आले की मग सर्वत्र ब्रम्हच दिसू लागते. मग तेथे कोणीही कोणाला विरोध करण्यासाठी येत नाही. एकदा की आपल्याला एखाद्या गोष्टीचा लाभ झाला तर ते आपल्या हाती लागतच असते म्हणजे आपल्याला ब्रम्हस्वरुपाचा लाभ झाला की ते आपल्या हाती लागते मग त्याने आपणच आपल्या ठिकाणी निश्चिंत राहतो. मग तेथे हर्ष आणि खंत या दोन्हीचाही नाश होतो. एकदा की व्दैत नाहीसे मग आपणच एकटे असतो. आणि जरी अशावेळी व्दैत दिसले तरी ते शब्दाने प्रसंगापुरतेच दिसते. तुकाराम महाराज म्हणतात, मी सर्व उपाधीचा झाडापाडा करुन त्यापासून वेगळा होऊन राहीलो आहे त्यामुळेच मला निश्चिंतीच्या गोड गोष्टी लागत आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग