विपरीत सुपरीत हा तो
2822.
विपरीत सुपरीत हा तो काळाचा विभाग । तेथे त्याग भोग करूनी काय ॥१॥
होणार ते होते आपुलें न चले कांही । वाया दुःख पाही मानू नये ॥२॥
जी जी संचितीं लिहिलीसे रेखा । ती तो ब्रह्मादिका न चुकेचि ॥३॥
एका जनार्दनी वाया का सायास । सुखदुःख लेश पूर्व कर्म ॥४॥
