सत्य माप वाढे । गाबा
2832.
सत्य माप वाढे । गाबाळाची चाली खोडे ॥१॥
उत्तरे ते कळे कसी । विखरोनि सर्वदेशी ॥धृपद॥
घरामध्ये राजा । नव्हे हो पट्ट पूजा ॥२॥
तुका म्हणे साचे । रूप ते दर्पणीचे ॥३॥
अर्थ :
जगामध्ये सत्याला वाढते माप असते आणि जे लबाड गबाळ खोटे आहे त्याला जग नांव ठेवीत असते हीच जगाची परंपरा आहे. खरा कसाला उतरलेला माल एकदा कळाला की त्याचा प्रचार सर्व देशामध्ये होतो. घरामध्ये बसून राजा कोणी होत नसतो तर त्यासाठी त्याची पट्टपूजा म्हणजे त्याचा राज्याभिषेक व्हावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, आरशामध्ये जे प्रतिबिंब दिसते ते खरे नसते तर ज्याचे प्रतिबिंब असते तो खरा असतो म्हणजेच जे सत्य आहे त्याला किंमत आहे आणि असत्य वस्तूला किंमत नाही.
