वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

अधर्में अदृष्टांचें

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084895 · अभंग क्र. २८२८

2828.
अधर्में अदृष्टांचें चिन्ह । विपरीत वचन ते ऐका ॥१॥
भांडारीं ठेविला कापूर उडे । समुद्रामाजीं तारूं बुडे ॥२॥
ठक येवोनि एकान्ती । मुलाम्याचें नाणें देती ॥३॥
परचक्र विरोध धाडी । खणीत लावूनी तळघरें फोडी ॥४॥
पाणी भरे पेंवा आंत । तेणे धान्य नासे समस्त ॥५॥
गोठण शेळ्या रोग पडे । निमती गाईम्हशींचें वाडे ॥६॥
भूमीनिक्षेप करू जाती । ते आपुल्याकडे धुळी वोढिती ॥७॥
बुद्धी सांगे वाडोवाड । तेथोनी तोंडी घाला दगड ॥८॥
ऐशी कर्माची अधर्म स्थिती । एका जनार्दनी सोशी फजिती ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग