वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

लेखिले कवित्व माझे स

🙏 3. संत तुकाराम · ABH-077238 · अभंग क्र. २८५०

2850.
लेखिले कवित्व माझे सहज बोल । न लगेचि ओल जिव्हाळ्याची ॥१॥
नयेचि उत्तर काही परतोनि । झालो नारायणे न सरते ॥धृपद॥
लाजिरवाणी का वदली हे वाचा । नव्हेचि ठायीचा मननशीळ ॥२॥
तुका म्हणे फळ नव्हेचि सायासा । पंढरीनिवासा काय झाले ॥३॥

अर्थ :
मी सहज जरी बोललो काही सहज जरी लिहिले तरी त्याला कवित्व मानले जाते परंतू त्यामध्ये काही प्रेमाचा जिव्हाळयाचा ओलावा लागत नाही. हे नारायणा मी तुझे एवढे काव्य केले तुझी एवढी स्तुती केली तरी देखील तुझ्या कृपेचा मला अनुभव अजूनही येत नाही त्यामुळे मला असे वाटत आहे की मी तुझ्याजवळ अजूनही मान्य झालो नाही. तरी माझी निर्लज्ज वाणी तुमचे काव्य का करीत आहे का ती व्यर्थ बडबड करत आहे कारण मी मूळचाच तुमचा मननशील भक्त नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीनिवासा मी कष्ट करुन केलेल्या काव्य रचनेला अजूनही फळ का येत नाही ते मला कळत नाही व नेमके झाले काय तेही मला समजत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग