वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

जेणे माझे चित्त राहे

🙏 3. संत तुकाराम · ABH-077084 · अभंग क्र. २८१३

2813.
जेणे माझे चित्त राहे तुझ्या पायी । अखंड ते देई प्रेमसुख ॥१॥
देहभाव राखा दीन करूनिया । जनाचारी वाया जाय तैसा ॥धृपद॥
द्रव्य दारा नको मानाची आवडी । कवणेविशी गोडी प्रपंचाची ॥२॥
तुझे नाम माझे धरूनिया चित्त । एकांत लोकांत सदा राहो ॥३॥
तुका म्हणे तुझे जडोनिया पायी । झालो उतराई पांडुरंगा ॥४॥

अर्थ :
देवा जेणेकरुन माझे चित्त तुझ्या पायाशी राहील असेच अखंड प्रेमसुख तुम्ही मला दयावे. देवा माझा देहभाव तू अतिशय दीन करुन टाक, की ज्यामुळे चार लोकांमध्ये मी काहीही उपयोगीला राहणार नाही तसेच तू माझे करुन टाक. देवा मला द्रव्य घरदार हे काहीही नको आहे मला मानसन्मानाची देखील आवड राहिली नाही आणि प्रपंचाविषयी कोणत्याही गोष्टीची मला गोडी राहिली नाही. देवा माझ्या चित्तामध्ये तुझे एक नामच धरुन राहिल असू दयावे मग ते एकातात असो किंवा लोकांतात असो सदा तुझे नामच माझ्या चित्तात राहू दयावे. तुकाराम महाराज म्हणतात, हे पाडूरंगा मी तुझ्या पायाशी जडून राहीलो आहे आणि तुझ्या उपकारातून उतराई झालो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग