वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

देवपूजे ठेवितां भावो

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084841 · अभंग क्र. २८६०

2860.
देवपूजे ठेवितां भावो । तो स्वयेंचि जाला देवो ॥१॥
आता कैसेनी पूजुं देवा । माझी मज होतसे सेवा ॥२॥
अन्न गंध धूप दीप । तेंही माझेंचि स्वरुप ॥३॥
एका जनार्दनी करी पूजा । तेथे पूज्य पूजकू नाही दुजा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग