वटपौर्णिमा व धर्मशास्त्रातील वृक्ष लागवड

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

स्कन्द पुराणात एक अद्भुत श्लोक आहे*:

अश्वत्थमेकम् पिचुमन्दमेकम्
न्यग्रोधमेकम् दश चिञ्चिणीकान् ।
कपित्थबिल्वाऽऽमलकत्रयञ्च. पञ्चाऽऽम्रमुप्त्वा नरकन्न पश्येत्।

अश्वत्थः = पिपंळ
पिचुमन्दः = कडूनिंब
न्यग्रोधः = वट वृक्ष
चिञ्चिणी = चिंच
कपित्थः = कवठ
बिल्वः = बेल
आमलकः = आवळा
आम्रः = आंबा
(उप्ति = झाडे लावणे)

जो कोणी या झाडांची लागवड करेल ,त्यांची निगा राखेल त्याला नरकाचे दर्शन होत नाही.
हे न अनुसरल्यामुळे आपल्याला दुष्काळ स्वरूपात नरकाचे दर्शन घडते आहे.
अजूनही वेळ गेलेली नाही आता तरी चुका सुधारू.

गुलमोहर निलगिरी सुबाभूळ ही झाडे आपल्या देशातील पर्यावरणाला घातक आहेत.
तरी पाश्चात्यांचे अंधानुकरण करून अगदी पर्यावरणाच्या बाबतीत देखील ज्या चुका घडल्या त्या वड, पिंपळ,आंबा चिंच आदी झाडे लावून पुढच्या पिढीला निरोगी आणि सुजलां सुफलां पर्यावरण देण्याचा प्रयत्न करू .🌱🌱🌳🌳

दुष्काळाचे खरे कारण
पिंपळ, वड आणि लिंब हि झाडे लावणे बंद केल्याने होत आहे हे वाचुन आपल्याला विचित्र वाटेल, परंतु हे सत्य आहे.

( पिंपळ कार्बन डाय ऑक्साइड १००% शोषून घेतो, तर वड ८०% आणि नीम ७५% शोषतो आणि हि झाडे परिसराला थंड हवामान तसेच ऑक्सिजन देवुन नैसर्गिक ताजेतवाने करण्याचे काम करतात ).

आपणच लोकांना खुश करण्यासाठी ह्या झाडांना लावणे टाळले आणि उलट यूकेलिप्टसची (नीलगिरी) झाडे लावण्यास सुरुवात केली. यूकेलिप्टस फार पटकन वाढते आणि दलदलीची जमीन कोरडी करण्यासाठी हे झाड लावले जाते. ज्यामुळे जमीन जलविहीन होते.गेल्या ४० वर्षांपासून हे वृक्ष सर्वमहामार्गांवर दुतर्फा लावले गेले आहेत. त्यामुळे नैसर्गिक ताजेतवाने न राहिल्याने, उष्णता वाढून वेगाने पाण्याची वाफ होत आहे.

पिंपळाला झाडांचा राजा म्हणतात.
त्याच्या स्तुती मध्ये एक श्लोक आहे –
मूले ब्रह्मा त्वचा विष्णु शाखा शंकरमेवच!!
पत्रे पत्रे सर्वदेवायाम् वृक्ष राज्ञो नमोस्तुते!!

याचा अर्थ समजला गेला पाहिजे.

येत्या काही वर्षांत प्रत्येक ५०० मीटर अंतरावर एक एक पिंपळ, वडाचे झाड लावले तर प्रदूषणमुक्त भारत होईल
या जीवन-वृक्षांची जास्त झाडे लावा आणि नीम आणि वडाची झाडे लावा. ज्यांच्याबाजूला जागा असेल तुळस लावा
या आपण सर्वांनी एकत्रितपणे आपल्या “भारताला ” नैसर्गिक आपत्तीतून वाचवू या.

सर्वांना विनंती आहे. कृपया जिथे शक्य होईल तिथं वृक्षारोपण करा.

पूजा साहित्य:-
हिरव्या बांगड्या, शेंदूर, एक गळसरी (काळी पोत), अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दूर्वा, गहू, सती मातेचा फोटो किंवा सुपारी इ.

पूजन विधी:-
प्रथम सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा.
स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा.
प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी.
गणपतीची हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी.

नंतर सती मातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजन करावे.
हळदी-कुंकू, काली पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे.
वडाचे मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती करावी.
वडास हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा.
वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालाव्या.
हे मंत्र म्हणावे-
” सावित्री ब्रम्हा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी।
तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात।।
अवियोगि यथा देव सवित्र्या सहीतस्य ते।
अवियोग तथास्माकं भूयात् जन्म जन्मनि।।”

5 सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी.
सायंकाळी सुवासिनी सह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे.
या प्रकारे प्रार्थना करावी –
`मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’.
झाडाची फांदी चे पुजन अमान्य आहे त्यामुळे फांदी तोडून किंवा तोडलेल्या फांदीचे पुजन करू नये पुजन करते वेळी ,राहुकाल , विष्टी करणं ,भद्रा ई बघू नयेत संकल्पपूर्वक १ वटवृक्षाचे झाडं लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी घ्यावी.

Vat Savitri Vrat 2022 : यंदा कधी आहे वटपौर्णिमा

ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. वास्तविक पाहता वटसावित्रीचे व्रत हे तीन दिवसीय व्रत असते. ज्या महिलांना संपूर्ण तीन दिवस व्रत करणे शक्य नाही, त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत आचरावे, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. चला जाणून घेऊया केव्हा आणि कधी आहे व्रत…

सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. वास्तविक पाहता वटसावित्रीचे व्रत हे तीन दिवसीय व्रत असते. ज्या महिलांना संपूर्ण तीन दिवस व्रत करणे शक्य नाही, त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत आचरावे, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. चला जाणून घेऊया केव्हा आणि कधी आहे व्रत…

वटसावित्री दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सौभाग्यलंकार परिधान करून वडाचे पूजन केले जाते. आधुनिक काळात वडाची फांदी घरी आणून त्याचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली आहे. मात्र, तसे करू नये, असा सल्ला दिला जातो. सन २०२२ मध्ये १४ जून मंगळवार रोजी वट पौर्णिमा आहे.

वटपौर्णिमाः १४ जून २०२२

पौर्णिमा प्रारंभः १३ जून २०२२ रोजी उत्तर रात्रौ ९ वाजून ०३ मिनिटे.
पौर्णिमा समाप्तीः १४ जून २०२२ रोजी सायं. ०५ वाजून २२ मिनिटे

पूजनासाठी आवश्यक साहित्य
चौरंग,पाट,लाल कापड, सूतगंडी, वडाच्या झाडांची कुंडी, खारीक२,बदाम२, सुपारी१०, खोबरे वाटी २,खडीसाखर, गुळाचा खडा, अष्टगंध, अक्षता, हळदी कुंकू, धूप तूपाचे निरंजन, माचिस, विड्याची पाने २५, आंबे, आसन, नित्य सेवा ग्रंथ, पानवड्यांचा नैवेद्य, यथा शक्ति दक्षिणा, पंचामृत, ताम्हण, पळी-पेला (तांब्याचे फूलपात्र), कलश, कापूर, फूले-दुर्वा, तूळशीपत्र, देवघरातील गणपती, शंख, घंटी, जानवे४, जोड, सूटी नाणी इ.

वटपौर्णिमा म्हणजे वडाच्या झाडाला पूजण्याचा संपूर्ण स्त्री जातीच्या सन्मानाचा सण. वटपौर्णिमा सणाला वडाच्या झाडाला महत्व आहे. वड हा आपल्या सावलीत आंपल्या सानिध्यात अनेक जिवन उपयोगी घटकांना वाढवत राहतो. म्हणून वडाची पूजा करण्यामागे त्याच्या संरक्षणाची जबाबदारी ची जाणीव पेरणे हा ही एक उद्देश आहेच. वडाच्या पारंब्या सारख्याच जन्मोजन्मीच्या गाठी ह्या बांधलेल्या असतात.

स्त्रोत: विकिपीडिया.

वटसावित्रीची आरती

अश्वपती पुसता झाला,नारद सांगती तयाला।
अल्पायुषी ‍सत्यवंत,सावित्रीने का प्रणिला?
आ‍णखी वरी बाळे,मनी निश्चय केला।
आरती वडराजा।।
दयावंत यमदुजा,सत्यवती ही सावित्री।
भावे करीन ‍मी पूजा,आरती वडराजा।।१।।
ज्येष्ठमास त्रयोदशी,करीती पूजन वडाशी।
त्रीरात्र व्रत करुनिया जिनकी सत्यवंताशी।।
आरती वडराजा।।
स्वर्गावरी जाऊनीया,अग्नीखांब कवळीला।
धर्मराज उचकला,हत्या घाली जीवाला।
येई गे पतीव्रते,पती नेई आपुला।।
आरती वडराजा।।
जाऊनिया यमापाशी,मागतसे आपुला पती।
चारी वर देऊनिया,दयावंता द्यावा पती।।
आरती वडराजा।।
पतीव्रते तुझी कीर्ती,ऐ‍कोणी ज्या नारी।
तुझे व्रत आचरती,तुझे भुवनी पावती।।
आरती वडराजा।।
पतीव्रते तुझी स्तुती,त्रिभूवनी ज्या करीती।
स्वर्गी पुष्पवृष्टी करुनिया,आणलासी आपुला पती।
अभय देऊनिया,पतीव्रते तरी त्यासी।।
आरती वडराजा।।

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *