आपल्या विचारांवर कुणीतरी “विचार” केलाच पाहिजे…

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

आपला दृष्टिकोन स्वच्छ ठेवा

एकदा एका कुटुंबाच्या समोरच्या घरात नवीन भाडेकरू राहायला येतात… खिडकीतून त्यांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे पाहून बायको नवऱ्याकडे तक्रार करते की, “लोक खूप चांगले आहेत, पण ते कपडे स्वच्छ धूत नाहीत”… नवरा म्हणतो, साबण संपला असेल… दुसऱ्या दिवशी वाळत घातलेले कपडे पाहून बायको परत तेच वाक्य म्हणते की, “लोक खूप चांगले आहेत, पण ते कपडे स्वच्छ धूत नाहीत”… कदाचित तिला कपडे चांगले धुता येत नसतील… नवरा फक्त ऐकून घेतो… असे रोजच चालते… एक दिवस ती पहाते, तर काय चमत्कार… एकदम स्वच्छ धुतलेले कपडे पाहून बायको नवर्‍याला म्हणते… “अहो ऐकलंत का?… समोरच्या वहिनी सुधारल्या…

त्यांना कुणीतरी कपडे धुवायला शिकवलेले दिसते… आज कपडे अगदी चकाचक धुऊन वाळत घातलेत”… तेवढ्यात नवरा बोलतो… अगं “राणी, मी आज सकाळी लवकर उठलो आणि आपल्या खिडक्या साफ केल्या”… काचा आतून आणि बाहेरून ओल्या फडक्याने पुसून घेतल्या… त्यामुळे तुला ते कपडे स्वच्छ दिसतात… समोरचे लोक रोजच कपडे स्वच्छ धूत होते… परंतु आपल्या खिडकीच्या काचा खराब असल्यामुळे त्यांची कपडे तुला खराब दिसत होती… समोरचे नाही, आपणच आता सुधारलोय… आपला दृष्टिकोन स्वच्छ ठेऊन आपण दुसर्‍याकडे पाहिले पाहिजे… नेहमी नजर चांगली ठेवा… जग खूप सुंदर आहे… “मातीने” एकी केली, तर वीट बनते… “विटेनी” एकी केली, तर भिंत बनते… आणि जर एकी “भिंतीनी” केली, तर “घर” बनते… या निर्जीव वस्तू जर एक होऊ शकतात, आपण तर माणसं आहोत… नाही का?… “विचार” असे मांडा की, तुमच्या विचारांवर कुणीतरी “विचार” केलाच पाहिजे…

बाळासाहेब हांडे संग्रहित सर्व साहित्य पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *