शिवकालीन वजने(मापे)

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

शिवकालीन वजने (मापे)

अठवे – शेराचा १/८
अडशेरि – अडीच शेर
अदपाव – अर्धा पावशेर
अदमण – अर्धा मण
अदशेर – अर्धा शेर
अधोली – अर्धी पायली
अंजली – ओजळभर पानी
आटके – अर्धा शेर
आढक – चार शेर, पायली
कर्ष – सोळा माषांचे एक परीमाण

कार्त – पाव रत्तल
किळवे – अर्धा छटाक, अर्धे निवळे
कुडव – आठ शेर
कुंभ – वीस खंडी
कोथळी – मुंबईत ६ मणांची गोनी
कोड – खंडी, वीस मण
कोळवे – शेराचा अष्ठमांश
खारी – १६ द्रोण, एक खंडी
गरांव – अर्ध गूंज माप
गिधवे – धान्य मोजन्याचे एक माप

गुंज – एक वजन परिमाण
चंपा – दोन शेर धान्याचे माप
चवाटके – छटाक
चवाळामण – एक प्रकारचा मण
चाटंक – पांच तोळे वजनाचे परिमाण
चाळीसा – चाळीस शेरांचे माप
चिटके – अर्ध्या कोळव्याचे माप
चिपटे – पावशेराचे माप
चिमटी – हाताचा अंगठा व तर्जनी याच्या पकडीत मावणारा पदार्थ
चिळवे – कोळव्याचा निम्मा भाग

चोथवा – एक पायली
चौटके – चार टाकांचे माप,छाटाक, चवटके
चौशेरी – चार शेरांचे माप
छटाकी – छटाक
छतिसी – छत्तीस परिमानाचे वजन
टवणा – पांच शेरांचे माप
टांक – एक तोळा
टिपरी – मापी पावशेर
टोमणे – पांच शेरांचे तेल मोजन्याचे माप
टवका – दोन्ही हातात मावेल एवढे परिमाण, कवटा

डवक – वस्तुवर पाचही बोटे पसरुन मारून घेतलेले परिमाण
डोळा – १६ शेरांचे माप
धडा – दहा शेरी वजन केलेल्या मापाचे परिमाण
धरण – सुमारे २४ गूंजाइतके वजन
नकटे – अर्ध्या पावशेराचे माप, निपटे,नवटाक,१० तोळ्यांचे वजन
नग – कापसाचे वजन करण्याचे एक परिमाण
नाकटी – दीड पावशेराचे माप
नाळके – एक माप
निउटके – शेराचा बत्तीसावा हिस्सा
तोळा – ९६ भार गुंजांचा तोळा

पक्का शेर – ८० तोळ्यांचा शेर
पड – मापी २ शेर, पाउन शेर
पल – ४० मासे वजन, ३८० गुंजांचे वजन
पल्ला – ३० पायली किंवा १२० शेर, १२० शेरांचे अडीच मणाचे पक्के वजन
पान – पावशेर
पाभ – एक प्रकारचे माप
पायली – चार शेरांचे माप
पायली – ४८ शेरांची खानदेशि एक पायली
पिक्कल – ५३२० सुरती रूपये भार वजन
पिटके – अदपाव

फरा/फरी – धान्य मोजन्याचे साधन
बेताळामण – १५६८ सुरती रुपयांचे एक माप
भरा – धान्याचे एक माप
भरो – चार खंडीचे कुडाळ प्रांतातिल एक माप
भार – आठ हजार तोळे वजन
मणखाण – सुमारे एक मण
मणका – एक मणाचे माप
मापटे – अर्धा शेर
मापारी – धान्य ई. मोजन्याचे फरां नावाचे एक माप
माष – पांच, आठ किंवा दहा रत्तीच वजन

मासा – आठ गुंजांचे वजन
मुटला – सहा शेराची गुळाची ठेप
मूठ – मुठभर धान्य
रत्तल/रतल – सुमारे १५ औसांचे म्हणजे ३६ सुरती रूपयांइतके वजन
रोवळा – एक माप
लिक्षा – मोहरीच्या दाण्याच्या एक षोडशांश वजनाइतके परिमाण
वाल – तिन गूंजाभर वजन
वैताद – एक तृतयांश तोळा
शणपो – भात मोजन्याची मोठी ओंजळ
शिरिद – पावशेर

शीग – धान्याचे माप भरले असता मापाच्या वर येणारी निमुळती रास
शिगवर – अगदी शीग लोटून सपाट केलेले माप
शेर – पदार्थ तोलावयाचे किंवा मापावयाचे एक प्रमाण
साक – एक हाताची ओंजळ
सामाशी – सहा मासे वजनाचे
सोट – सुमारे २० पायली धान्य भरून तोंड शिवलेले पोते.

🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *