बासरी, बासुरी पावा, वेणू.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

बासरी
बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.
पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते , असं बासरी तयार करणारे सांगतात.
त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी ‘मी’ येतो.
याच ‘मी’पणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे.
कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी.
एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या,
आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो,
त्याच्या आजूबाजूला वावरतो,
पण तो आम्हाला साधा भावही देत नाही.
तू तर एवढी साधी, ना रूप ना काही.
पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो. तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर?
बासरी हसली आणि म्हणाली, ‘तुम्ही माझ्यासारख्या व्हा, मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल.’
अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं.
बासरी पुढे म्हणाली, ‘मी अगदी सरळ आहे,
ना एखादी गाठ, ना एखाद वळण. मी पोकळ आहे.
त्या पोकळीतून माझ्यातला अहंकार गळून पडलाय.
माझ्या अंगावरच्या सहा भोकांतून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे
रिपू मी काढून टाकले आहेत.
मला स्वतःचा आवाजही नाही. माझ्या सख्यानं फुंकर मारली तरच मी बोलते.
तो जशी फुंकर मारतो तशी मी बोलते.’
गोपी निरुत्तर झाल्या.
तेव्हापासून त्या बासरीवर रुसून आहेत.
म्हणूनच असेल कदाचित, पण आज आपल्याकडे एकही स्त्री बासरीवादक नाही …….!

बासरी …

अहंकारहित शरीर ही श्रीहरीची बासरी होय.
“आपण जी सेवा करतो ती दुस-यासाठी” ही कल्पना माणसाला अहंकारी बनविते, याच्या उलट “आपण जी सेवा करतो ती आपल्याच कल्याणासाठी ” ही भावना त्याला प्रेमळ बनविते.
अहंकार हा आहे कलिकाळाचा फास, म्हणून अहंकाराचा नाश तेथे सर्व सुखाचा वास.

  

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading