एके घाई खेळता न पडसी
3708.
एके घाई खेळता न पडसी डाई । दुचाळ्याने ठकसील भाई रे ।
त्रिगुणाचे फेरी थोर कष्टी होसी । या चौघासी तरी धरी सोई रे ॥१॥
खेळ खेळोनिया निराळा चि राही । सांडी या विषयाची घाई रे ।
तेणे चि खेळे बसवंत होसी । ऐसे सत्य जाणे माझ्या भाई रे ॥धृपद॥
सिंपियाचा पोर एक खेळिया नामा । तेणे विठ्ठल बसवंत केला रे ।
आपुल्या सवंगडिया सिकवूनि घाई । तेणे सतत फड जागविला रे ।
एक घाई खेळता तो न चुके चि कोठे । तया संत जन मानवले रे ॥२॥
ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा । सोपान आनंदे खेळती रे ।
कान्हो गोवारी त्यांनी बसवंत केला । आपण भोवती नाचती रे ।
सकळीका मिळोनी एकची घाई । त्याच्या ब्रम्हादिक लागती पायी रे ॥३॥
राम बसवंत कबीर खेळीया । जोड बरवा मिळाला रे ।
पाचा सावन्ग्दिया एकची घाई । तेथे नाद बरवा उमटला रे ।
ब्रम्हादिक सुरवर मिलोनिया त्यांनी । तो हि खेळीया निवडीला रे ॥४॥
ब्राम्हणाच पोर खेळीया ऐका भला । तेणे जन खेळकर केला रे ।
जनार्दन बसवंत करुनिया तेणे वैष्णवाचा मेळ मेळविला रे ।
एकची घाई खेळता खेळता । आपणची बसवंत जाला रे ॥५॥
आणिक खेलीये होऊनिया गेले । वर्णावया वाचा मज नही रे ।
तुका म्हणे गडे हो हुशारुनी खेळा । पुढिलांची धरुनिया सोई रे ।
एकची घाई खेळता जो चुकला । तो पडे संसार डाई रे ॥६॥
अर्थ :
अरे भाई, एक्यभाव मनी धरून कोणताही खेळ खेळशील तर संसाराच्या डावात पडणार नाहीस. (एक्यभाव )त्यापासुन दूर राहिलास तर फसशील. त्रिगुणाच्या फेऱ्यात तू अडकलास तर फार दुःखी होशील. तसे होउ नये म्हणून चार वेदांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब कर. अरे भावा, खेळ खेळून अलिप्त रहा. विषयचा संग टाकून दे. या ख
