पांगुळ ३७१३ ते ३७१५
3713.
पांगुळ ३७१३ ते ३७१५
मी माझे कल्पनेने जाहलोंसे पांगुळ । चालता न चलवेचि कोठे न मिळे स्थळ । हिंडलों
दिशा दाही श्रम जाहला केवळ । कवण हीभ्रांती वारी कैं भेटेल गुरुदयाळ ॥१॥ धर्म जागोगुरुमहिमा देही दाविला देव । निवारुनी भवरजाळे अवघा निरसला भेव ॥धृ.॥ कर्म त्याअकर्माच्या लागती वाटे ठेसा । संपत्ती विपत्तीचामानिला भरंवसा । कन्या पुत्र आप्त जन हा तोसहज वोळसा । या भ्रमडोहीं बुडालों धांवे गुरुरायासर्वेशा ॥२॥ येउनी गुरुनाथें माथा ठेविला करू । अज्ञानतिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू । गर्जतचालियेलों फिटला अज्ञान अंधारू । एका जनार्दनीमाझा श्रीगुरु उदारू ॥३॥
