गोपाळ म्हणती कान्होब
3733.
गोपाळ म्हणती कान्होबा या रे काही मागो । आपुलाले आम्ही जीवीची तया आवडी सांगो ।
एक म्हणती उगे रे उगे रे उगे रे मागेचि लागो । निजो नका कोणी घरी रे आजि अवघेचि जागो ॥१॥
जाणोनि नेणता हरी रे मध्ये उगाचि बैसे । नाइकोनि बोल अइके कोण कोणाचे कैसे ।
एक एकाच्या संवादा जाणे न मिळे ची ऐसे । पोटीचे होटा आणवी देतो तयांसि तैसे ॥धृपद॥
एक म्हणति बहु रे आम्ही पीडिलो माया । नेदी दहींभातसिदोरी ताक घालिती पिया ।
तापलो वळिता गोधने नाही जीवन छाया । आता मागो पोटभरी रे याच्या लागोनि पाया ॥२॥
एक म्हणति तुमचे अरे पोट ते किती । मागो गाई म्हैसी घोडे रे धन संपत्ति ।
हाती देव गडी कान्होबा आमुचा आम्हा काय विपत्ती । कन्याकुमरे दासी रे बाजावरी सुपती ॥३॥
एक म्हणती बेटे हो कोण करी जतन । गाढव तैसेंचि घोडे रे कोण तयाचा मान ।
लागे भवरोग वाहता खांदी चवघे जण । हाती काठ्या डोया बोडक्या हिंडो मोकळे राण ॥४॥
एक म्हणती रानी रे बहु सावजे फार । फाडफाडू खाती डोळे रे पाय नेतील कर ।
राखोनि राखे आपणा ऐसा कइचा शूर । बैसोनि राहो घरी रे कोण करी हे चार ॥५॥
घरी बैसलिया बहुते बहु सांगती काम । रिकामे कोणासि नावडे ऐसे आम्हासि ठावे ।
चौघांमध्ये बरे दिसेसे तेथे नेमक व्हावे । लपोनि सहज खेळता भले गडियासवे ॥६॥
एक म्हणती गडी ते भले मळिती मत्ता । केली तयावरी चाली रे बरी आपुली सत्ता ।
नसावे ते तेथे तैसे रे खेळ हाणिती लाता । रडी एकाएकी गेलिया गोंधळ उडती लाता ॥७॥
एक म्हणती खेळता उगी राहती पोरे । ऐसे काय घडो शके रे कोणी लहान थोरे ।
अवघी येती रागा रे एका म्हणता बरे । स
